विहूर , ग्रामपंचायत ही रायगड जिल्हा परिषद, मुरुड पंचायत समिती अंतर्गत येणारी एक ग्रामिण स्वराज्य संस्था आहे. गावाची लोकसंख्या २६२० असून महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात वसलेले एक महत्त्वपूर्ण गाव आहे. हे गाव विहूर ग्रामपंचायतीचे मुख्यालय आहे, ज्यामध्ये विहूर सह मोरे या महसूल गावांचा समावेश आहे. रायगड जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव आदिवासीबहुल भागातील विकास आणि प्रशासनाचे एक केंद्र आहे
मुरुड तालुक्यातील इतर प्रमुख पर्यटन स्थळांप्रमाणे, विहूर मध्ये थेट या गावाच्या जवळच्या भागात काही विहूर आदिवासी पट्ट्यात आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले असल्यामुळे, इथले निसर्गसौंदर्य खूप आल्हाददायक आहे.तसेच विहूर ड्याम प्रेक्षणीय स्थळ आहे. विशेषतः पावसाळ्यात हा परिसर हिरवागार होतो आणि डोंगरांमधून अनेक छोटे-मोठे धबधबे दिसतात. स्थानिक मंदिर: गावामध्ये काही स्थानिक देवी-देवतांची मंदिरे आहेत, जी स्थानिकांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. या ठिकाणी विविध सण-उत्सवांच्या वेळी जत्रा भरते, ज्यामुळे स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेता येतो. थोडक्यात, विहूर हे स्वतः एक प्रमुख पर्यटन केंद्र नसले तरी, येथील शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे
सरपंच
७९७२५०२२२५
उपसरपंच
९२२६३३०१६३
ग्रामपंचायत अधिकारी
९८५००२५५४१
कुटुंबांची संख्या
लोकसंख्या
पुरुष
महिला
विहूर ग्रामपंचायत द्वारे पुरवल्या जाणाऱ्या उत्कृष्ट सुविधा
ग्रामपंचायत विहूर हद्दीत विहूर धरणामधून नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झालेली असून कुटुंबांना मुभलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो.
ग्रामपंचायत हद्दीत घनकचरा व्यवस्थापन करणे कामी ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबांना वैयक्तिक कचराकुंडी वाटप केले आहेत. व ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक जागे ठिकाणी ओला व सुका कचरा संकलन होणे कामी सार्वजनिक मोठी कचराकुंडी देखील ठेवण्यात आली आहे. ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण होऊन डंपिंग ग्राउंडवर व्यवस्थापन करण्याचे नियोजन केलेले आहे.
ग्रामपंचायतीचे सर्व मुख्य रस्ते डांबरी असून गावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
स्मशानभूमी पक्क्या रस्त्याने जोडलेली असून सोलर पथदिव्यांची सुविधा उपलब्ध आहे.
गावातील शाळा संगणक, प्रॉजेक्टर आणि Wi-Fi सुविधांसह डिजिटल बनविल्या आहेत.
ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व रस्त्यांवर एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत.
गावातील सांडपाणी निचरा करण्यासाठी पक्क्या गटारींची सोय करण्यात आलेली आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील सर्व प्राथमिक शाळांना पिण्याचा पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. मुल व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह व मुतारीची सुविधा उपलब्ध आहे. हॅण्ड वॉश स्टेशन ची सुविधा उपलब्ध आहे. मध्यान्ह भोजन योजना अंतर्गत किचन व्यवस्था उपलब्ध आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अंगणवाड्या डिजिटल केलेल्या आहेत बलस्नेह स्वच्छता गृह व पिण्याचा पाण्याची सुविधा उपलब्ध आहे आहे.
महाराष्ट्र शासन आणि ग्रामीण विकास विभाग
माननीय मुख्यमंत्री
Hon'ble Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय उपमुख्यमंत्री
Hon'ble Deputy Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय उपमुख्यमंत्री
Hon'ble Deputy Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय मंत्री
Hon'ble Minister
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
माननीय राज्यमंत्री
Hon'ble Minister of State
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
प्रमुख सचिव
Principal Secretary
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी
District Collector & Magistrate
रायगड जिल्हा
अतिरिक्त जिल्हाधिकारी
Additional District Collector
रायगड जिल्हा
मुख्य कार्यकारी अधिकारी
Chief Executive Officer
जिल्हा परिषद, रायगड
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
Deputy Chief Executive Officer
जिल्हा परिषद, रायगड
ब्लॉक विकास अधिकारी
Block Development Officer
मुरुड तालुका